#Goshtichi Shala Storytelling गोष्टींची शाळा मी इयत्ता १ ली ते ४ थी च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर ता माण जि सातारा येथे एकटाच शिक्षक कार्यरत आहे. आमची पट संख्या ९ वरून ४० वर पोहचली आहे. तसा मी तंत्रज्ञान चा अभिनव वापर करून माझे काम करण्याचे अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत , तरीही ४ वर्गांना अध्यापन करणे म्हणजे मोठी कसरत होऊ लागली. म्हणजे एक प्रकारे समस्या निर्माण झाली. मग काय , समस्या असेल तरच माणूस धडपड करतो आणि धडपडीतूनच मार्ग सापडतो.आणि मग सुरु झाला आमचा “गोष्टीची शाळा” हा उपक्रम. गोष्टीच का ? १) गोष्टी मुलांना खूप आवडतात. २) विद्यार्थी गोष्ट सहज व आनंदाने आत्मसात करतात. ३) गोष्टींचे स्मरण चिरकाल राहते. ४) ऐकण्याबरोबर सांगण्याचा हि प्रयत्न करतात. ५) गोष्टी अभिव्यक्तीला वाव देतात. ...