Skip to main content

Mind Map

 Mind Map For Advance learning





--------------------------------------------------------------------------------------------------------------

                                                      Mind Map worksheet

                                    If online education is not possible due to various reasons then how to stop education? Is this the same method that I used to use in school when I started school? Can it be used in lockdown now? I came to this question and decided that you should use your ‘Mind Map worksheet’ method.

                                      The method now is to write a word in a circle in the center of the school board and the students would write as many words as they can relate to those words. So how can I use it now? I found a way to write a word and print it out and get as many xeroxes as there are kids.

                                       Since I have a laptop and a printer, I was able to do all this in my own home even in lockdown. Those who do not have these facilities can do it using a simple carver sketch pen and create action sheets. I thought I would find two to three ways. If there is no contenment zone, then the first way is to go to the school village twice a week on Sundays and Wednesdays and give the actual children and bring home after collecting the last time. The second way is to give the postman to the uncle for those who can. And if you are in contenment, then medical stores are started. It is possible for the parents to come and take the children to the store by writing the new ones on it.

                                                 Now, as a teacher, I started giving them familiar words and writing words related to them. From time to time I started giving new words to them. Then I started taking help of my elder brother and sister. As a result, children began to think of new words, read books, began to seek the help of adults, so automatically their reading, writing, and thinking skills began to improve, and I began to understand whether or not they did so by collecting worksheets and evaluating them. The children's vocabulary seems to be growing exponentially and they are getting to do and write something. Sometimes it is more interesting to give a picture instead of a word. 

                    Inforapid is best platform for creating creative mind map chart.

-----------------------------------------------------------------------------------------------------------






Mind Map worksheet

                             अनेकविध कारणामुळे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही तर मग शिक्षण बंद कसे ? यावर मी शाळा सुरु असताना शाळेमध्ये एक नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करायचो तीच पद्धत सध्या लॉकडाऊन मध्ये वापरता येईल का ? या प्रश्नापर्यंत मी आलो आणि ठरवले की आपण आपली ‘Mind Map worksheet’ ही पद्धत वापरायची.

 आता काय आहे ही पद्धती तर शाळेत फलकावर मध्यभागी एका गोलात एक शब्द लिहायचा व विद्यार्थ्यांनी त्या शब्दांशी संबधीत जेवढे शब्द सांगता येतील तेवढे लिहायचे.मग सध्या मला कसा वापर करता येईल तर मी ठरवले कि मी घरी सध्या कागदावर हे आखणार अथवा संगणकावर एक डीझाईन बनवणार व मध्यभागी एक शब्द लिहणार आणि त्याची प्रिंट काढून जेवढी मुले तेवढ्या झेरॉक्स काढणार असा मार्ग मला सापडला.

                             माझ्याकडे laptop व प्रिंटर असल्याने लॉकडाऊन मध्ये सुद्धा  मी माझ्या घरात बसून हे सर्व करू शकलो ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत ते साधा कागर्व स्केच पेन वापरून सुद्धा करू शकतात व कृती पत्रिका तयार करू शकतात.आता या विद्यार्थ्यांना कशा द्यायच्या हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मी विचार करून मला दोन ते तीन मार्ग सापडले जर contenment झोन नसेल तर मी आठवड्यात २ वेळा रविवारी व बुधवारी शाळेच्या गावात जाऊन प्रत्यक्ष मुलांना देणे व मागील वेळेस दिलेल्या जमा करून घेऊन घरी आणून तपासणे हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग पोस्टमन काकांकडे देणे ज्यांना शक्य आहे त्यांच्या साठी. आणि जर आपण contenment मध्ये असला तर मेडिकल स्टोर सुरु असतात मुलांची नवे त्यावर लिहून दुकानात ठेवणे पालक येऊन घेऊन जातील हा एक मार्ग यासाठी शक्य आहे.या  पद्धतीने मुलांना कृती पत्रिका पोहचू लागल्या.

                                      आता शिक्षक म्हणून मी सुरुवातीला त्यांना परिचित शब्द देऊन त्यांच्याशी संबधीत शब्द मुले लिहू लागली अधून मधून नवीन शब्द दिले कि मग मोठा भाऊ बहिण यांची मदत घेऊ लागली कधी कधी घरच्यांना विचारून हे पूर्ण करू लागले.मी जमा करून आणलेल्या कृती पत्रिका तपासून काही दुरुस्त्या सह पुन्हा त्यांना देऊ लागलो यातून मुले नवीन शब्दासाठी विचार करू लागले, पुस्तके वाचू लागले, मोठ्यांची मदत घेऊ लागले त्यामुळे अपोआप त्यांचे वाचन लेखन, विचार करणे ही कौशल्य सुधारू लागले व ते करतात कि नाही हे मला कृतीपात्रिका जमा केल्यामुळे समजू लागले व त्यांचे मूल्यमापन पण करणे याद्वारे शक्य होऊ लागले.मुलांचा शब्दकोश खूप मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे व प्रत्यक्ष काहीतरी करायला, लिहायला मिळत आहे त्यात कधी कधी शब्दा एवजी  एखादे चित्र दिल्याने अधिक मनोरंजकता येऊ लागली त्या त्या वर्गानुसार त्याचा स्तर ठेवून मुलांना ऑनलाईन जरी शक्य नाही तरी अशा काही मार्गाने आपण त्यांचं शिक्षण सुरु ठेऊ शकतो.




Comments

Popular posts from this blog

Japanese Language for Rural student

  Hindustan Times News TV9 Marathi News News18 Lokmat News Tv9 News Freepress News Hello Maharashtra News Eduvarta News जि  प शाळा विजयनगर ची मुले जपानीत निपुण विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे                                       सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि प शाळा विजयनगर व तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसत आहेत व त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील १ ली ते ४ थी चे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.                                       बालाजी जाधव यांनी सांगितले कि आज समाजातील खूप सारे तरून पदवी नंतर परदेशात नोकरी साठी प्रयत्न करतात मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ती नामी संधी मिळत नाही मात्र विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना हि भविष्यात समस्या येऊ नये म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेतच त्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली व अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज

Japani Teacher at ZP School Vijaynagar

 When Japani Teacher Teach at rural ZP School

ABP Majha Story

 ABP Majha channel make story on our school project