Skip to main content

Soap Making

 Soap Making




Soap production: -

                          I learned this for a special reason, 80% of the parents in my school go to Mumbai, Pune for painting. The children live with their elderly grandparents. I have been in this school for almost 4 years now. It doesn't matter how many times I visit my parents about the hygiene of my children and then I decide to make soap at school and give it to them at home. I tried it out at home by ordering the necessary materials online and then it was not affordable to buy all the necessary materials for it. Then I realized that some of these things we can produce ourselves She brought it to school and she got better. I ordered the soap base and mold online and started the process with its help. It requires a mixer, the school needs electricity, I buy electricity from the house next door to the school with my own money, and it also needs a freezer, so in the beginning I used to bring it all from my house. The children did not have all the processes in the society, so at the request of the neighbor Gulig Kaka, they brought their mixer to the school, demonstrated all the processes to the children and kept them in the fridge for 24 hours. And ready Saba started using it at school, before meals, at the toilet and at the same time started giving 1 soap to every child at home for 2 weeks and the big problem of children's hygiene and health is solved today. It is our intention to make it available not only in the present but also in the future for the children to become entrepreneurs in the soap making business.

-------------------------------------------------------------------------------

साबण निर्मिती :-

                हे मी खास कारणाने शिकलो , जिथे माझी शाळा आहे तेथील ८० % पालक रंगकाम करण्यासाठी मुंबई, पुण्याला जातात मुले वृद्ध आजी आजोबा पाशी राहतात, मी जवळपास ४ वर्षे झाली या शाळेत आहे मुलांच्या स्वच्छते बद्दल किती तरी वेळा पालक  भेटी घेवून सुद्धा फरक पडत नव्हता आणि मग ठरवले की आपणच शाळेत साबण बनवायचे व ते घरी द्यायचे.लॉक डाऊन मध्ये हे हि मी घरी बसून शिकलो आवश्यक साहित्य ऑनलाईन मागवून घरी याचे प्रयोग करून पहिले आणि मग त्यासाठी आवश्यक सर्व साहित्य विकत घेणे परवडणारे नव्हते मग यातील काही गोष्टी आपण स्वत: उत्पादन करू शकतो हे माझ्या लक्षात आले व त्यातील प्रमुख घटक म्हणजे कोरफड, शाळेशेजारी एका घरी खोप कोरफड होती ती लॉक डाऊन मध्ये आणून शाळेत लावली व ती चांगली आली सुद्धा. आणि त्यासाठी लागणारे सोप बेस ,मोल्ड हे ऑनलाईन मागवले व त्याच्या साह्याने प्रक्रिया सुरु केली.त्यासाठी मिक्सर लागतो,शाळेत वीज लागते, मी शाळे शेजारील घरून स्वताच्या पैशाने वीज विकत घेवून वापरतोय ,आणि फ्रीज पण लागतोय मग सुरुवातीला मी हे सर्व माझ्या घरून करून आणायचो मात्र मुलांना सर्व प्रोसेस समाजात नव्हती,मग शेजारील गुळीग काका यांना विनंती करून त्यांचा मिक्सर शाळेत आणून मुलांना सर्व प्रोसेस प्रात्यक्षिक दाखवून ते २४ तास फ्रीज मध्ये ठेवण्यास सुद्धा पालकांची मदत सातत्याने घेतली. व तयार सबाने शाळेत,जेवणापूर्वी, स्वच्छतागृह याठिकाणी तर वापर होवू लागला सोबत प्रत्येक मुलाला २ आठवड्याला घरी १ साबण देण्यास सुरुवात केली व मुलांच्या स्वच्छता व आरोग्य याचा मोठा प्रश्न आज सुटला आहे मात्र यासाठी आर्थिक पाठबळ लाभल्यास पूर्ण गावाला अल्प किमतीत साबण पुरवठा करण्याचा व त्यातून निधी उपलब्ध करण्याचा  आमचा मानस असून फक्त वर्तमान च नव्हे तर मुलांनी भविष्यात साबण बनवण्याच्या व्यवसायत उतरून उद्योगपती व्हावे हा सुद्धा हेतू ,भविष्यकालीन धोरण आहे.











Comments

Popular posts from this blog

Japanese Language for Rural student

  Hindustan Times News TV9 Marathi News News18 Lokmat News Tv9 News Freepress News Hello Maharashtra News Eduvarta News जि  प शाळा विजयनगर ची मुले जपानीत निपुण विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे                                       सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि प शाळा विजयनगर व तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसत आहेत व त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील १ ली ते ४ थी चे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.                                       बालाजी जाधव यांनी सांगितले कि आज समाजातील खूप सारे तरून पदवी नंतर परदेशात नोकरी साठी प्रयत्न करतात मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ती नामी संधी मिळत नाही मात्र विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना हि भविष्यात समस्या येऊ नये म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेतच त्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली व अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज

Japani Teacher at ZP School Vijaynagar

 When Japani Teacher Teach at rural ZP School

ABP Majha Story

 ABP Majha channel make story on our school project