Skip to main content

Archery

 

Archery.

                    Since I was at home in Lockdown, my daughter Bhakti used to ask me what game you used to play at my age, and when it mentioned archery, she started teaching me, and then, as a child, I used to climb a lemon tree, break its small branch and tie a rope to it. I showed my daughter what I used to do in front of her and we started practicing every day in the open space in front of the house and she started getting better easily. At the Olympics 2020, Praveen Jadhav, a boy from a very ordinary family in our Satara district, was showing his skills in archery all over the world. I realized that this could easily happen in our school And we started learning archery from a distance of 10 feet by making a circle on the protective wall of the school, showing them all the procedures, how to hold an arrow, how to aim them on the tab at school. All the parents come to the school to look into these matters and say that there is nothing new in our time. Some of my grandmothers used to say that they would forget to read and write, but I told them that you should not believe it.

            The children have learned all the basic skills. Now we need modern equipment. After that we are determined to participate in the tournament. This helped me to increase my concentration.

-----------------------------------------------------------------------------

धनुर्विद्या.   

          लॉक डाऊन मध्ये घरी असल्याने माझी मुलगी भक्ती मला विचाराची की पापा तुम्ही माझ्या वयात कोणकोणते खेळ खेळायचे आणि यामध्ये मग धनुर्विद्या चा उल्लेख होताच मला पण शिकवा असा तिचा सूर येवू लागला व मग जसा मी लहानपणी लिंबाच्या झाडावर चढून त्यांची छोटी फांदी तोडायचो व त्याला दोरी बांधून धनुष्यबाण करायचो अगदी तसा माझ्या मुलीला मी बन तिच्या समोर करू दाखवला व घरासमोरील मोकळ्या जागेत आम्ही दररोज सराव करायला लागलो तर सहजपणे तिला तो चांगला येवू लागला. सोबतच ओल्म्पिम्क २०२० मध्ये आमच्या सातारा जिल्ह्यातील प्रवीण जाधव नावाचं अगदी समान्य कुटुंबातील मुलगा धनुर्विद्या मध्ये जगभरात आपलं कौशल्य दाखवत होता या प्रेरणेतून आपल्या शाळेत हे सहजपणे होवू शकते याची मला कल्पना आली आणि शाळेभोवती असणाऱ्या लिंबाच्या झाडावर ४ ठी ची मुले भराभर चढून छोट्या फांद्या कढून आम्ही धनुष्यबाण बनवले व शाळेत tab वर त्यांना कसा ,असतो बाण, कस नेम धरतात, हे सर्व प्रक्रिया दाखवून शाळेचा संरक्षक भिंतीवर गोल करून १० फुट अंतरावरून आम्ही धनुर्विद्या शिकण्यास सुरुवात केली. सर्व पालक या बाबी ब पाहण्यास शाळेकडे येत व म्हणत की आमच्या वेळी नव्हती बा अशी शाळा गुरुजीच काही तरी नवीनच असतं. बघा लिहण वाचन विसरून जातील असेही काही आजीबाई म्हणायच्या पण मी त्यांना सांगितले की तुम्ही विश्वास ठेवा असे काही व्हायचे नाही.

                   मुले प्राथमिक सर्व कौशल्य शिकली आहेत आता आम्हाला आधुनिक साधनांची आवश्यकता आहे मग त्यांनतर आम्ही स्पर्धेत सहभागी होण्याचा संकल्प केला आहे व भविष्यात ज्याच्या कडे याचं उत्तम कौशल्य आहे त्याला जागतिक स्पर्धेत खेळताना मला पहायचे आहे. यामुळे एकाग्रता वाढण्यास मला साह्य झाले.








Comments

Popular posts from this blog

Japanese Language for Rural student

  Hindustan Times News TV9 Marathi News News18 Lokmat News Tv9 News Freepress News Hello Maharashtra News Eduvarta News जि  प शाळा विजयनगर ची मुले जपानीत निपुण विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे                                       सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि प शाळा विजयनगर व तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसत आहेत व त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील १ ली ते ४ थी चे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.                                       बालाजी जाधव यांनी सांगितले कि आज समाजातील खूप सारे तरून पदवी नंतर परदेशात नोकरी साठी प्रयत्न करतात मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ती नामी संधी मिळत नाही मात्र विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना हि भविष्यात समस्या येऊ नये म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेतच त्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली व अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज

Japani Teacher at ZP School Vijaynagar

 When Japani Teacher Teach at rural ZP School

ABP Majha Story

 ABP Majha channel make story on our school project