Skip to main content

MultiSkill Development


MultiSkill Development Programe
 English Story 


Hindi story

Marathi Story


 
       Multiskill Development Program (MDP)

                                       Skill based Education

                    In fact, looking at the title, everyone thinks that what about the education in the book? But after completing all the study conclusions in the book, I came up with the idea of ​​giving this extra-curricular education to my students. Do you teach them anything that will benefit them in life? And then I got a very short answer. In fact, in order to pass the time, I gave the answer as value education, and to some extent it was true. But from that day on, I used to think that Does it teach anything that will be useful to my students in making their lives easier in the future and in the work of national upliftment?

                Then I thought why don't you teach something like that? The answer, after much thought, was that if you want to teach something innovative, you have to come up with it first. So what happens to me Or have I learned something in my school life that a book that is out there and is currently benefiting me in my life is for the betterment of the nation or for the benefit of others? And quickly my Mr. Gade Sir reminded me that I wanted to teach the best maths but he taught me rhetoric and debating skills consistently and showed me a new way of success by participating in various competitions. This is very beneficial for him.

                So what can I do as a teacher if I want to teach my students something like this? The thought first came to my mind and then I got the answer that you should come first to what you want to teach. It all started in June 2020 with the idea that Kovid would shut down the school world and then we decided to learn something that would be useful for our students and then we started listing it and learning how and where to learn it online. And in about 3 to 4 months I sat at home with my daughter Bhakti and completed some courses and learned some things or skills that I did not even meet to learn in my school or DED, which is actually as a teacher. It is necessary to learn such things.

                Now I have learned these things but not everything we have learned can be easily taught to the students because on the one hand it is new, the required materials have to be available, different time is required for it, every student is interested in different things, enough manpower, financial support, then I was the only teacher in the 1st to 4th school, Kovid had turned to CSR health due to Kovid, but I decided to teach at least 5 skills that would be useful to them for the rest of their lives. There should be variety in it and I then fixed 5 skills accordingly

1) Playing The Piano 

 2) Soap making. 

3) Warli painting.

4) Archery. 

5) Wrist Watch making.


                        It is not easy but certainly not impossible to do these things in the day to day work of the school. The financial provision is a big problem for everyone and everyone can find their own way even on their own. I am working on it according to my needs and preferences, I am ready to help them as much as possible so that every teacher can find a different way, if the government pays more attention, it will be easier and easier. Nothing is impossible if you just keep your student in mind.

 

Balaji Baburao Jadhav, Primary Teacher.

ZP School Vijayanagar (Paryanti) Tal. Man Dist Satara. 7588611015

crcmhaswadno3@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------

Multiskill Development Programe(MDP)

skill based Education(पुस्तका बाहेरील शिक्षण )

                             खरं तर शिर्षक पाहून प्रत्येकाला वाटेल की मग पुस्तकातील शिक्षणाचं काय ? पण पुस्तकातील सर्व अध्ययन निष्पत्ती पूर्ण करूनच हे पुस्तकाबाहेरील शिक्षण माझ्या विद्यार्थ्यांना मला द्यावे अशी कल्पना सुचली.ही कल्पना सुचाण्याचे  अनेक करणे आहेत त्यामधील सर्वात प्रमुख कारण म्हणजे माझ्या आंतराष्ट्रीय पुरस्काराच्या मुलाखतीत मला विचारला गेलेला प्रश्न होता.तुम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तका बाहेरचं म्हणजे जे असं की विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल असं काही शिकवता का ?आणि मग माझ्याकडे याचं उत्तर अगदी अल्पसं आलं म्हणजे खरं तर वेळ मारून नेण्यासाठी मी मुल्य शिक्षण असे उत्तर दिलं होतं,व काही प्रमाणत ते खरेही होतं.मात्र त्या दिवशी पासून मी विचार करायचो की असं आपण खरचं काही शिकवतो का की ज्याचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांचं आयुष्य सुलभ करण्यास व राष्ट्र उन्न्त्तीच्या कामात उपयोगी पडेल ?

                             मग मी विचार केला की आपण असं काही का शिकवत नाही ? त्याचं उत्तर मलाखूप विचार केल्यानंतर असं भेटलं की काहीतरी असं नाविन्यपूर्ण शिकवायचं असल्यास ते अगोदर आपल्याला आलं पाहिजे. मग मला असं काय येतं ? किंवा मी असं काही माझ्या शालेय जीवनात शिकलो की जे पुस्तका बाहेरचं आहे व ते सध्या माझ्या आयुष्यात मला लाभदायक ठरून त्याचा राष्ट्र उन्नती किंवा इतरांना फायदा होतोय? आणि चटकन माझे श्री. गाडे सर मला आठवले की जे गणित तर सर्वोत्तम शिकवायचे मला पण मला त्यांना वक्तृत्व व वादविवाद कौशल्य सातत्याने शिकवून विविध स्पर्धामध्ये मला सहभागी करून यशाचा एक नवा मार्ग दाखवला व आज त्या एकमेव कौशल्या मुळे मी देशभरातील शिक्षकामासाठी २०० कार्यशाळा घेवून शिक्षणातील विविध प्रयोग जगासमोर सहजपणे मांडतोय व इतरांना ही  त्याचा खूप फायदा होतोय.

                             मग एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना मला असं काही शिकवायचं असल्यास मी काय करू शकतो ? हा विचार सर्वप्रथम माझ्या डोक्यात आला आणि मग त्याचं उत्तर भेटलं की जे शिकवायचं ते अगोदर तुम्हाला आलं पाहिजे. हे सर्व जून  २०२० मध्ये विचार सुरु होते, कोविड  मुळे शाळाच काय पूर्ण जग बंद होतं आणि मग ठरवलं की आपणही असं काहीतरी शिकायचं की आपल्याला ते आपल्या विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरेल आणि मग त्याची यादी करणे सुरु झाले व ऑनलाईन ते कसे व कोठून शिकता येईल याबद्दल माहिती घेवू लागलो आणि शिकायला सुरुवात पण केली.आणि जवळपास ३ ते  ४ महिन्यात मी माझ्या मुलीबरोबर भक्ती बरोबर घरी बसून काही कोर्सेस पूर्ण केले व अशा काही बाबी किंवा कौशल्य शिकलो की जे मी माझ्या शालेय अथवा डीएड मध्येही मला शिकायला भेटले नाहीत,जे खरं तर एक शिक्षक म्हणून अशा बाबी शिकणं आवश्यक असतं.

                             आता या बाबी मी शिकलो मात्र शिकलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला विद्यार्थ्यांना सहजपणे शिकवता येतेच असे नाही कारण एक तर ती नवीन असते, त्यासाठीचे आवश्यक साहित्य उपलब्ध असावे लागते ,त्यासाठी वेगळा वेळ दयावा लागतो ,प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगळ्या गोष्टीत रस असतो,पुरेसं मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ, मग मी तर १ ते ४ च्या शाळेत एकटाच शिक्षक,कोविड मुळे CSR आरोग्या कडे वळला होता ,अशा एक न अनेक अडचणी माझ्या समोर उभ्या राहिल्या ,मात्र मी ठरवले की या वर्षी काही झाले तरी कमीत कमी ५ अशी कौशल्य मुलांना शिकवायची जे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील.त्यात विविधता पण असावी आणि मी मग त्याप्रमाणे ५ कौशल्य निश्चित केले

१) पियानो वादन.              २) साबण निर्मिती.             ३) वारली चित्रकला.

४) धनुर्विद्या.                     ५) घड्याळ निर्मिती.


                             एकूणच शाळेचे दैनदिन काम करत करत या बाबी करणे सहज तर नक्कीच नाही मात्र अशक्य पण नाही,त्यासाठी आर्थिक तरतूद ही मोठी समस्या सर्वांना भेडसावत असते त्यावर सुद्धा प्रत्येकजण आपआपल्या परीने मार्ग काढू शकतात.सहकारी यांची साथ, प्रशासनाचे सहकार्य ,शाबासकी अपेक्षित असते, याचं मूल्यमापन नसल्याने चुकत चुकत शिकत गेलो.माझ्या गरजेनुसार ,आवडीनुसार मी यावर काम करतोय, प्रत्येक शिक्षकांनी असा वेगळा मार्ग शोधावा त्यासाठी मी शक्य त्यांना मदत करण्यास तयार आहे, शासनाकडून यत लक्ष घातल्यास अधिक सहजता व सुलभता येवू शकेल. बस आपला विद्यार्थी हे डोळ्या समोर ठेवल्यास काहीही अशक्य नाही .

 

बालाजी बाबुराव जाधव,प्राथ शिक्षक .

जि प शाळा विजयनगर (पर्यंती) ता. माण जि सातारा. ७५८८६११०१५

crcmhaswadno3@gmail.com

Comments

Popular posts from this blog

Japanese Language for Rural student

  Hindustan Times News TV9 Marathi News News18 Lokmat News Tv9 News Freepress News Hello Maharashtra News Eduvarta News जि  प शाळा विजयनगर ची मुले जपानीत निपुण विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे                                       सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि प शाळा विजयनगर व तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसत आहेत व त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील १ ली ते ४ थी चे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.                                       बालाजी जाधव यांनी सांगितले कि आज समाजातील खूप सारे तरून पदवी नंतर परदेशात नोकरी साठी प्रयत्न करतात मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ती नामी संधी मिळत नाही मात्र विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना हि भविष्यात समस्या येऊ नये म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेतच त्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली व अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज

Japani Teacher at ZP School Vijaynagar

 When Japani Teacher Teach at rural ZP School

ABP Majha Story

 ABP Majha channel make story on our school project